स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भरतेचे’ लक्ष्य बाळगून आगेकूच करणाऱ्या भारताला आता सोशल मीडियातही अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध होत आहते. जागतिक स्तरावर बोलबाला असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ‘कू ऍप’ ची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे भारत सरकार आणि ‘ट्विटर’ चे संबंध ताणले गेले असतानाच भारतात ‘कू’ ऍप्लिकेशनची हवा सुरु झाली आहे आणि त्याला भारतीयांचा भरभरून प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

‘कू’ हे ऍप २०२० साली प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असून अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी हे ऍप उपलब्ध आहे. ऑगस्ट २०२० मध्ये या ऍपला भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पुरस्कारही मिळाला होता. सध्या तीस लाखांपेक्षा जास्त लोक हे ऍप वापरत आहेत.
अप्रमेय राधाकृष्ण आणि मियांक बिडावटका यांनी या ऍपची निर्मिती केली आहे. अस्सल भारतीय असणाऱ्या या ऍपमध्ये स्थानिक भारतीय भाषांचे पर्यायही उपलब्ध आहेत.

मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण कू ऍपवर असल्याचे सांगत जनते सोबत जोडले जाण्याचे आव्हान केले. त्यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि इतर अनेक मंत्री आणि मंत्रालयाची खाती कू ऍपवर आहेत.

Exit mobile version