मागील कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. या महामार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. अजून हे काम किती वर्षे असेच चालणार आहे, अशा कोकणवासीय विचारत होते, आंदोलनेही करण्यात आली. शिंदे-फडणवीस यांच्या भाजपा-शिवसेना सत्तेत आली. जनतेचे सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपावण्यात आली. या खात्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी खुली करण्याचा ध्यास घेतला होता.
गणेशोत्सवापूर्वी आपला प्रवास सुखदायक होईल, आश्वासन दिले होते. याचाच एक भाग म्हणून कशेडी घाटाचा बोगदा हा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यात येत आहे. रवींद्र चव्हाण हे वारंवार मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची अपडेट्स घेऊन हे काम कसे युद्धपातळीवर करून पूर्ण करता येईल, यावर लक्ष ठेवून होते.
हेही वाचा :
काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोदींचे पोस्टर्स शेअर केले; नंतर कळले चूक झाली!
काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोदींचे पोस्टर्स शेअर केले; नंतर कळले चूक झाली!
निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त
आताच पाहा, नाहीतर निशिमुरा धुमकेतू दिसणार थेट ४०० वर्षांनंतर
कशेडी घाटाच्या नागमोडी वळणातून वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागत होते. वळणावळणाच्या रस्त्यामुळे चालकाबरोबर इतर प्रवाशांनाही हा घाट घाम फोडत असे. हा घाट पार करायला जवळजवळ एक तासाचा अवधी लागायचा. आता हा घाट कशेडी बोगद्यामुळे अवघ्या दहा मिनीटांत पार करता येणार आहे. या भुयारी मार्गामुळे वेळेशिवाय इंधनाची बचत होणार आहे, अशी माहिती राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.