बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम

सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा

बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के इतका लागला आहे.

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. तपशीलात त्यांनी सांगितले की, यंदा ३.११ टक्क्यांनी निकाल घटला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९२.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३.८२ टक्क्यांनी अधिक लागला आहे. राज्यातील ४३ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला २९.७४ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

 

विभागानिहाय निकाल

 

कोकण : ९८.११ टक्के, कोल्हापूर : ९६.७३ टक्के, पुणे : ९५.६४ टक्के, मुंबई : ९३.६६ टक्के, औरंगाबाद : ९३.२३ टक्के, अमरावती : ९३.२२ टक्के, लातूर : ९२.६७ टक्के, नाशिक : ९२.२२ टक्के आणि नागपूर : ९२.०५ टक्के

हे ही वाचा:

डी – मार्ट मॅनेजरने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट

केरळ स्टोरीबद्दलची नसिरुद्दीन यांची भूमिका खेदजनक

‘मद्यधोरण चांगले होते तर मागे का घेतले?’

साक्षीच्या हत्येत वापरलेला चाकू सापडला; साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा

 

राज्यात १०० टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५१ – लातूर १०८, औरंगाबाद २२, अमरावती ७, मुंबई ६, पुणे ५ आणि कोकण ३

 

यंदा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. याआधी मार्च २०२० : ९५.३० टक्के, मार्च २०२१ : ९९.९५ टक्के, मार्च २०२२ : ९६.९४ टक्के निकाल लागला होता.

 

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

Exit mobile version