कोकण रेल्वेची संकल्पना मधुकर दंडवते यांच्या अथक प्रयत्नाने साकार करण्यात आले होते. सुरुवातीला डिझेल इंजिन पासून सुरु झालेली रेल्वे सेवा आता आधुनिकतेच्या जोरावर विद्युतीकरण म्हणजेच इलेक्ट्रिक माध्यमातून रेल्वे गाड्या चालू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ६ टप्प्यामध्ये कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले असून, विद्युतीकरणांसाठी १ हजार २८७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१५ पासून या कामाला सुरुवात करण्यात आले होते. त्यानंतर विद्युतीकरणांची प्रकिया मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाली असून, आता टप्प्याटप्प्याने कोकणात जाणाऱ्या प्रवासी गाड्या विद्युत इंजिनवर चालवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास आता पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होण्यास मुक्त मदत होईल.
रोहा ते ठोकूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन ६ महिने अगोदर काम झाले आहे. पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबरपासून दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस तसेच मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस आता विद्युत इंजिनसह धावणार आहे. त्यापाठोपाठ आता दिवा-सावंतवाडी, मांडवी आणि कोकण एक्सप्रेस या प्रवासी गाड्या येत्या २० सेप्टेंबर पासून विद्युत इंजिनसह धावणार आहेत, पूर्वीच्या डिझेल इंजिन पेक्षा विद्युत इंजिनचा वेग अधिक असणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या वेळेतही बचत होईल.
मुंबई ते कोकण अप व डाउन मार्गावर दररोज २० रेल्वेच्या फेऱ्या होतात. तसेच देशभरातून एकूण ३७ रेल्वे गाड्यांची वाहतूक कोकणात होते. यामुळेच डिझेल इंजिनच्या धुरामुळे प्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणात होते. रेल्वेगाडीला ०१ किमीसाठी किमान ६ ते १० लिटर डिझेलची गरज लागते. तसेच इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल ही होत असतो. संपूर्ण वर्षभरासाठी इंधनासाठी १५० ते २०० कोटी इतका खर्च येतो. शिवाय डिझेल इंजिनमुळे इंधनावर खर्चही जास्त प्रमाणात होतो. त्याचबरोबर विद्युत इंजिनचा वापर केल्यास खर्च कमी होऊन, रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल.
हे ही वाचा:
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे ९९ व्या वर्षी निधन
नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
टप्प्याटप्प्याने सर्वच डिझेल इंजिन आता विद्युत इंजिनवर चालविण्यात येणार आहेत. जनशताब्दी एक्सप्रेस येत्या १५ ऑक्टोबरपासून तर १ जानेवारी २०२३ पासून मंगलोर एक्सप्रेस चालू करण्यात येणार आहे. मुंबई करमाळी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस ही १५ ऑक्टोबर पासून विद्युत इंजिनसह चालविण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी येथे विद्युत नियंत्रणासाठी सब स्टेशन उभारण्यात येणार आहे.