27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषदिवाळीपासून कोकण होणार 'हाऊसफुल'

दिवाळीपासून कोकण होणार ‘हाऊसफुल’

Google News Follow

Related

सुट्ट्या सुरू होताच अनेक घरात पर्यटनाचे बेत आखले जातात. परंतु गेल्या पावणे दोन वर्षांपासून मात्र पर्यटनाची हौस भागविण्याची संधी मात्र मिळाली नाही. त्यामुळेच सध्याच्या घडीला लसीकरण पूर्ण झालेल्या अनेकांनी पर्यटनासाठी कोकणाला पहिली पसंती दिलेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे तसेच कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी कोकण हेच हमखास आवडते ठिकाण असेल. त्यामुळेच सध्याच्या घडीला कोकणातील एमटीडीसीकडे बुकिंग फुल झाले आहे.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणे आहेत. कोल्हापूरपासून ज‌वळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात.

आंबा, फणस, करवंद, जांभूळ अशा कोकणच्या मेव्यासह समुद्रकिनारी साहसी खेळांची मजा लुटता येते. त्यामुळे अलिकडच्या काळात कोकणची सहल विशेष ठरते. समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे कोकण कायमच हवाहवासा वाटतो.

धार्मिक पर्यटन करणाऱ्यांसाठी गणपतीपुळे, कुणकेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिर, परशुराम मंदिर असे अनेक पर्याय आहेत. गणपतीपुळे येथे राहण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. गडकिल्ले पाहणाऱ्यांसाठी सिंधुदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग हे किल्ले साद घालतात, तर समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या पर्यटकांसाठी तारकर्ली, तोंडवली, चिवला, वेंगुर्ला, गणपतीपुळे, मालवण असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणांचाही पर्याय आहे. आंबोली येथील एक दिवसाची सहल पर्यटकांना थंडाव्याचा अनुभव देते. याशिवाय सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे असते.

 

हे ही वाचा:

२७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

अभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!

हिमवृष्टीमुळे ११ गिर्यारोहकांना गमवावे लागले प्राण

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

 

कोल्हापुरातून कोकणात जाताजाता राधानगरीचे धरण, दाजीपूरचे अभयारण्यही पाहता येते. कोकण म्हंटले की खाण्यापिण्याची चंगळच असते. कोकणच्या मेव्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. बहुतांश पर्यटक कोकणात जाऊन माशांवर यथेच्छ ताव मारतात. समुद्रकिनारी होणाऱ्या लिलावात स्वत: ताजी मासळी खरेदी करून त्याचा आस्वाद घेता येतो. घरगुती पद्धतीचे मासे तयार करून देणारी घरे समुद्र किनारी आहेत.

याशिवाय खास कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक हॉटेल्स पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. कोकणची मिठाईदेखील चविष्ट आणि खास कोकणी पद्धतीची असते. आंबा पोळी, आंबा बर्फी, काजू बर्फी, गूळशेव, तांदळाचे मोदक, जांभूळ, फणस, करवंदाच्या फ्लेवरमधील चॉकलेट्स असे अनेक पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा