25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषमहेश मांजरेकर म्हणतात, ...कोन नाय कोन्चा, चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच!

महेश मांजरेकर म्हणतात, …कोन नाय कोन्चा, चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच!

Google News Follow

Related

महेश मांजरेकर यांचा ‘ वरणभात लोन्चा अन् कोन नाय कोन्चा ‘ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर चित्रपटाचा ट्रेलर सर्व माध्यमांवरून काढण्यात आला. यासगळ्या प्रकरणात मांजरेकर सोशल मीडियावर त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
” नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ची प्रसिद्धी सुरू करण्यात आली, त्या क्षणापासून हा चित्रपट केवळ प्रौढांसाठीच असल्याचे आम्ही प्रत्येक वेळी सांगितले आहे. तशा आशयाची ओळही सिनेमाच्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

जे यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत, यातील दृश्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पाहावा अशी विनंतीही आम्ही सातत्याने केली आहे. हा सिनेमा विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याची माहितीही आम्ही देत आलो आहोत.” असे मांजरेकर म्हणाले आहेत.

राज्य महिला आयोगानं त्या चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेतला होता. त्यावर मांजरेकरांनी सोशल मीडीयावर या प्रकरणी एक पत्रकही जाहीर केलं आहे. ” नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी

 

हा चित्रपट १८ वर्षे वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही ‘नाय वरनभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’च्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली आहेत.” असेही मांजरेकर म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा