हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

सहा डब्यांच्या मेट्रोची शनिवारी होणार चाचणी

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

आता मेट्रो पाण्याखालूनही धावणार आहे. पाण्याखालून जाणारी देशातील पहिली मेट्रो आता लवकरच सुरु होणार आहे. शनिवार,९ एप्रिल रोजी या मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. हुगळी नदीच्या खाली बांधण्यात आलेल्या बोगद्यातून ही मेट्रो धावणार आहे.

कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाअंतर्गत दोन सहा डब्यांच्या गाड्या या चाचणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. सॉल्ट लेकमधीम हावडा मैदान आणि सेक्टर ५ ला जोडणारा पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉर सेक्टर व्ही स्टेशन आणि सियालदह दरम्यान या मेट्रोचा कमी अंतराचा मार्ग आहे. सहा डबे असलेल्या या मेट्रो ट्रेन्स एस्प्लानेड ते हावडा मैदानादरम्यान ४.८ किलोमीटर अंतरासाठी या मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे.

सॉल्ट लेक आणि हावडा दरम्यान होणाऱ्या या चाचणीमध्ये सियालदह आणि एस्प्लेनेड या बोगद्यातून ही मेट्रो धावणार आहे. त्याच वेळी, सियालदह ते एस्प्लानेड दरम्यान ट्रॅक टाकण्याचे काम अपूर्ण आहे. तात्पुरता ट्रॅक टाकून ही चाचणी घेण्यात येणार आहे. सियालदह स्थानकापर्यंत गाड्या नेहमीप्रमाणे धावतील परंतु सियालदह ते एस्प्लानेड पर्यंत ही इंजिनाच्या मदतीने बोगद्यातून जाईल .

हे ही वाचा:

भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवा, पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. देशातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यातच १९८४ मध्ये सुरू झाली. यानंतर २००२ मध्ये दिल्लीत याची सुरुवात झाली आणि आता अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. त्याचबरोबर कोलकात्याच्या शिरपेचात आता पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोची भर पडणार आहे.

Exit mobile version