इंडियन प्रीमिअर लीगच्या १७व्या हंगामाचा समारोप शानदार झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर कोलकात्याने हैदराबादवर आठ विकेटने मात केली. कोलकात्यासमोर हैदराबादने विजयासाठी केवळ ११४ धावांचे किरकोळ लक्ष्य ठेवले होते. कोलकात्याने अवघ्या ११ षटकांतच हे लक्ष्य साध्य केले. कोलकात्याचा संघ तिसऱ्यांदा आयपीएलविजेता ठरला आहे. विजेत्या कोलकाता संघाला २० कोटी रुपये मिळाले आहेत तर, हैदराबादला १२.५० कोटी रुपये मिळाले आहेत.
आयपीएलमधील सर्वोच्च चार संघांची रोख बक्षिसे
- विजेता संघ (कोलकाता) – २० कोटी रुपये
- उपविजेता संघ (हैदराबाद) – १२.५० कोटी रुपये
- तिसऱ्या क्रमांकाचा संघ (राजस्थान) – सात कोटी रुपये
- चौथ्या क्रमांकाचा संघ (बेंगळुरू)- ६.५ कोटी रुपये
यांनाही मिळाली विविध पारितोषिके
- हंगामात सर्वाधिक विकेट (पर्पल कॅप)- हर्षल पटेल २४ विकेट (१० लाख रुपये)
- हंगामात सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- विराट कोहली ७४१ धावा (१० लाख रुपये)
- हंगामातील उगवता खेळाडू – नीतीशकुमार रेड्डी (१० लाख रुपये)
- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सिजन – सुनील नारायण (१० लाख रुपये)
- इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सिजन – जेक फ्रेजर-मॅकगर्क (१०लाख रुपये)
- फँटसी प्लेयर ऑफ द सिजन – सुनील नारायण (१० लाख रुपये)
- सुपर सिक्सेस ऑफ द सिजन – अभिषेक शर्मा (१० लाख रुपये)
- कॅच ऑफ द सिजन – रमणदीप सिंह (१० लाख रुपये)
- फेयरप्ले ऍवॉर्ड- हैदराबाद
- रूपे ऑन द गो-४एस ऑफ द सिजन – ट्रेव्हिस हेड (१० लाख रुपये)
- पिच अँड ग्राऊंड ऍवॉर्ड- हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (५० लाख रुपये)
हे ही वाचा:
फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक
पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!
अंतिम सामन्यात मिळालेले पुरस्कार
- इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच – वेंकटेश अय्यर
- फँटसी प्लेयर ऑफ द मॅच – मिचेल स्टार्क
- सुपर सिक्सेस ऑफ द मॅच – वेंकटेश अय्यर
- रुपे ऑन द गो ४ एस ऑफ द मॅच – हर्षित राणा
- प्लेयर ऑफ द मॅच – मिचेल स्टार्क