८ ऑगस्ट रोजी कोलकाताच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरची निर्घृण बलात्कार-हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरातील डॉक्टर ठिकठिकाणी आंदोलने करून संताप व्यक्त करत आहेत. आता निर्भयाच्या आईनेही या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार पीडित निर्भयाची आई आशा देवी यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट ) कोलकाता येथे घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणावर भाष्य करत संताप व्यक्त केला. आशा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ममता आपल्या पदाचा गैरवापर करत आहे आणि घटनेतील दोषींवर कारवाई करण्याऐवजी, आंदोलने करून लोकांचे लक्ष या मुद्द्यावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ‘ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या प्रमुख आहेत. माणुसकीला लाजवेल अशी घटना त्यांच्या राज्यात घडते, ज्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. अशा स्थितीत ममतांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जमावाने रुग्णालयाच्या आवारात हल्ला करणे, घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करणे आणि आंदोलक डॉक्टरांवर हल्ला करणे हे लज्जास्पद आहे. अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयाकडून तात्काळ शिक्षा व्हावी. केंद्र आणि राज्य सरकार जो पर्यंत गंभीर होत नाही, तोपर्यंत देशाच्या विविध भागांतून अशा प्रकारच्या रानटी घटना रोज समोर येतील.
हे ही वाचा :
रक्षाबंधन सणानिमित्ताने भावांकडून बहिणीला ओवाळणी !
लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण !
उदयपूर हिंसाचारात मोठी कारवाई, आरोपीच्या घरावर बुलडोझर, वीज कनेक्शनही कापले !
अटल सेतूवरून उडी मारू पाहणाऱ्या महिलेला पोलिसांनी, कारचालकाने वाचवले!, थरारक व्हीडिओ व्हायरल