पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेवरून देशभरात निदर्शने होत आहेत. या घटनेवरून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्य पोलिसांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘तुम्ही माझा तीन वर्षांचा रेकॉर्ड पाहा. कोलकात्यात घडलेला गुन्हा आसाममध्ये घडला असता, तर आमच्या सरकारने तातडीने न्याय दिला असता’, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्याचे विरोधक सरकारच्या या धोरणावर टीका करत आहेत, पण मला काही फरक पडत नाही. मुलींच्या रक्षणाकरिता कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील डॉक्टर, विशेषत: महिला डॉक्टरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आसाम सरकारने पावले उचलली आहेत. कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिला प्रशिक्षणार्थीच्या पालकांना न्याय मिळेल, अशी आशा मुख्यमंत्री सरमा यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा :
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन
आग्र्यात स्कुटी चालविणाऱ्या मुलीचा पाठलाग; युसूफ, फिरोजला अटक
उदयपूर चाकू हल्ला प्रकरण; देवराजचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद !
हाथरस, उन्नाव बलात्कार प्रकरणे हाताळणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडे कोलकाता प्रकरण !
दरम्यान, हे प्रकरण आता सीबीआयच्या हाती आहे. सीबीआयने या प्रकरणाची जबाबदारी दोन महिला अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असून नायायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे ओढले आहेत.