माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !

मेडिकल कौन्सिलने नोंदणी केली रद्द

माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !

कोलकाता बलात्कार प्रकरण आणि आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांनी वेढलेले माजी प्राचार्य संदीप घोष यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने संदीप घोष यांची नोंदणी रद्द केली आहे. कौन्सिलकडून नोंदणी रद्द केल्यामुळे ते आता आपल्या नावापुढे डॉक्टर लिहू शकणार नाहीत.

याबाबत पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने नोटीस जारी केली आहे. कौन्सिलच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कौन्सिलने संदीप घोष यांना ६ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु १३ दिवस उलटूनही त्यांचे उत्तर आलेले नाही. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, त्यांचे उत्तर न मिळाल्याने वैद्यकीय परिषदेने त्यांचे नाव नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या रजिस्टरमधून काढून टाकण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा

‘गांधी कुटुंबाकडून पंजाबला जाळण्याचे काम’

नंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!

राजस्थानमध्ये ३५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका

दरम्यान, माजी प्राचार्य संदीप घोष हे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरवातीला ईडीने अटक केली, यानंतर महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version