कोलकाता डॉक्टर हत्येप्रकरणी भाजपकडून ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी !

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात येणार 'कँडल मार्च'

कोलकाता डॉक्टर हत्येप्रकरणी भाजपकडून ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी !

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाने जाहीर केले आहे की, पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात येणार आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेवरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसमोरही भाजप आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात आरजी कर हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राज्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या महिला शाखेद्वारे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) दक्षिण कोलकातामधील कालीघाट येथून ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात येईल. तसेच राज्यातील विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी ज्युनियर डॉक्टर आंदोलन करत आहेत, त्या आंदोलकांना भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही ममता बॅनर्जींच्या निवासस्थानापर्यंत ‘कँडल मार्च’ काढणार असल्याचे सुकांत मजुमदार यांनी सांगितले.

हे ही वाचा :

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधींना मागची सीट, सरकारने दिले उत्तर !

‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात

कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

गंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

 

Exit mobile version