25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषकोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

१० जणांची सुटका करण्यात यश

Google News Follow

Related

कोलकाता येथील गार्डन रीच परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या पाचमजली इमारतीचा काही भाग रविवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी लगतच्या झोपड्यांवर कोसळला. यात झोपडपट्टीतील १० जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव मोहीम सुरू असल्याची माहिती आपत्कालीन बचाव पथकातील एका कर्मचाऱ्याने दिली.
बचावकार्य सुरू असले तरी अंधारामुळे आणि चिंचोळ्या जागेमुळे क्रेनला येथे येण्यात अडथळे येत आहेत, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दुर्घटना घडताच, कोलकात्याचे पोलिस आयुक्त विनीत गोयल पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

कोलकाता महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३४मध्ये येणारा हा बाग कोलकाता पोर्ट या विधानसभा मतदारसंघात येतो. सन २०११पासून हा मतदारसंघ कोलकात्याचे महापौर व नगरविकास मंत्री फरहाद हकिम यांच्याकडे आहे. या इमारतीचे बांधकाम अवैधरीत्या सुरू होते, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. कोलकाता महापालिकेच्या नियमानुसार, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये पाचमजली इमारती बांधण्यास परवानगी नसताना या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाच्या ठिकाणी जाणारा मार्ग हा तीन फुटांपेक्षा लांब नाही, असा स्थानिकांचा दावा आहे.

हे ही वाचा:

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

‘निवडणूक रोखे कोणी दिले, माहीत नाही’

“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत?”

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे काम सुरू झाले. अशा प्रकारच्या अनेक इमारतींचे बांधकाम परिसरात सुरू आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. येथे बहुतेक रहिवासी मुस्लिम समुदायातील आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना ही दुर्घटना घडल्याने भाजपने तृणमूल काँग्रेसला लक्ष करण्याची संधी सोडली नाही. येथे लवकरात लवकर मदत पोहोचवण्याची विनंती प. बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून सरकारकडे केली. सोमवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत सरकारने या दुर्घटनेबाबत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा