कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

मुंबईमधील किनारपट्टीलगत असलेल्या पुनर्विकासाला आता लवकरच चालना मिळणार आहे. मुंबईतील किनारपट्टी अंतर्गत बांधकामांना आता लवकरच हिरवा कंदिल मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दाखवलेल्या पुढाकारामुळे आता किनारपट्टी भागातील बांधकामास वेग येणार आहे. याचा प्रामुख्याने फायदा हा झोपडपट्ट्या तसेच जीर्ण इमारतींना होणार आहे. कोळीवाडे तसेच गावठाणांनाही याचा चांगलाच फायदा होणार आहे. ठाणे खाडी परिसरातील विकासाला या निर्णयामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळेच अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन वाढीव एफएसआय मिळणार आहे.

सीआरझेडनुसार किनारपट्टीलगतच्या बांधकामांसाठी काही आवश्यक निर्बंध असतात. त्यामुळेच स्थानिक पातळीवर परवानगी मिळाली तरीही, केंद्राची परवानगी ही गरजेची असते. मुख्य बाब म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये मंजुरी मिळत नसल्याकारणाने काम अडून राहते. याच गोष्टीकडे लक्ष वेधून मुंबई आणि उपनगरासाठी आता किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलेले आहे.

या आराखड्याला केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाची मंजुरी मिळालेली आहे. १०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम विकासाची आता परवानगी मिळाल्यामुळे हे बांधकाम आता तेजीने होण्यास सुरुवात होईल. यामुळेच महत्त्वाचा फायदा म्हणजे निवासी बांधकामांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच मुख्य म्हणजे एफएसआयमध्येही यामुळे वाढ होणार आहे. त्यामुळेच जुन्या गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्या आता पुनर्विकासासाठी पात्र ठरणार आहेत.

 

हे ही वाचा:

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

संजय राऊत…काश्मीरात भाजपाने हे केले!

आम्ही निष्पक्ष यंत्रणा आहोत, आमच्यावरील आरोप खोटे!

 

मुंबई बेट असून शहरामध्ये १.३३ तर उपनगरामध्ये फक्त १ एफएसआय सध्याच्या घडीला आहे. आता नवीन आराखड्याला मंजुरी मिळाल्यामुळे हा नवा एफएसआय २.५० असणार आहे. त्यमुळे ५० मीटर अधिक जागा व वाढीव एफएसआय यामुळे किनारपट्टी भागातील अनेकांना याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version