28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषरामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !

शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज (२३ ऑगस्ट) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांना एकत्र होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून रिक्षांसह सर्व व्यावसायिक बंधू, तसेच शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला शिवसेना शिंदे गटासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. समाजातर्फे आज सकाळी १० ते ५ या वेळेत कडकडीत कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोणताही अनुचित प्रकरण घडू नये यासाठी तसेच परिस्थितीचे गांभीर्य पाहून शहरातील संपूर्ण चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

अरविंद केजरीवालचं दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक

पूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

कोल्हापुरातील शियेमध्ये एका १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ निषेधार्थ आज शिये गाव बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणीही मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना कोल्हापुरात अशी घटना घडल्याने कोल्हापूर शहरासह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा