महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले.
कोल्हापूरमधील राधानगरी धरण शंभर टक्के भरले, राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे चार वाजता उघडले, ३ नंबर आणि ६ नंबरच्या दरवाजामधून पाण्याचा विसर्ग, दोन्ही दरवाजांमधून एकूण ४२३६ क्यूसेक्स पाणी भोगावती नदीपात्रात जमा झालं आहे.
महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.
श्री नारायण सगन धामणेकर पोल्ट्री फार्म शेतकरी श्री राजू मरागळे यांच्या इब्रहिमपूर ता चंदगड जिल्हा कोल्हापूर यांच्या शेतामधील पोल्ट्री फर्ममध्ये ओढा फुटून पाणी जावून सुमारे २ त ३ हजार पक्षी मरण पावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षी दगावल्यानं पोल्ट्री व्यावसायिकाचं तब्बल ८ ते १० लाख रुपये नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणारे का भेटले नवाज शरीफ यांना?
‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार
पंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुल्ला यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरले होते. यावेळी पोल्ट्री मधील तब्बल १६ हजार कोंबड्या मृत्यू मुखी पडल्या आहेत. त्याामुळे पोल्ट्रीचे व्यावसायिकाचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.या पुरात शेती बरोबर जनावरे आणि कोंबड्यानं ही फटका बसला आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.