भारतीय नौदल आणि भारतीय नौकानयन संघटनेच्या (INSA) माध्यमातून एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्पर्धा म्हणजे ‘ऑफशोर नौकानयन स्पर्धा’! कोची ते गोवा दरम्यान या ऑफशोर नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत भारतीय नौदलाच्या नौका सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये म्हादेई, तारिणी, बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या सहा भारतीय नौदल नौकांचा (INSVs) समावेश असणार आहे. ही स्पर्धा रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होणार आहे. तर एकूण पाच दिवसांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नौकांना कोची पासून गोव्यापर्यंतचे अंतर पार करायचे आहे. कोची इथल्या नौदल तळावरून सुरुवात केल्यानंतर गोवा पर्यंतचे अंदाजे ३६० सागरी मैलाचे अंतर या नौकांना पार करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च
अखेर फैजाबाद स्थानकही बनले अयोध्या
दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
नौदलाच्या सहभागी होणाऱ्या सहा नौकांपैकी चार नौका ४० फूट आणि दोन नौका ५६ फूट ऊंचीच्या आहेत. तर नौदलाच्या तीन कमांडसह अंदमान आणि निकोबार कमांड (ANC ) आणि संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालय (HQ MoD ) मधील नौदल कर्मचारी या नौकांचे स्पर्धे दरम्यान परिचालन करतील. याशिवाय, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) शी संलग्न क्लबच्या नौका देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या मोहिमेचे आयोजन संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (HQ MoD ) आणि आयएनएस मांडवी, गोवा स्थित भारतीय नौदलाच्या ओशन सेलिंग नोड (OSN) ने केले आहे.