दरवर्षी आपल्याकडे राष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो. पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. तर एक पूर्णांक पाणी हे जमिनीखाली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढाळणारे ९७ टक्के पाणी समुद्र आणि महासागरामध्ये आहे. जे पाणी पिण्यासाठी उपयुक्त नाही , फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. असे म्हंटले जाते जगातील चौथे महायुद्ध हे पिण्याच्या पाण्यासाठी होणार असल्याचे म्हंटले जाते. जागतिक जलदिनाचा उद्देश जगातील सर्व देशांमध्ये प्रत्येक माणसापर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे आवश्यक असल्यामुळे पाण्याच्या संवर्धनकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वाढत्या जलसंकटाकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी जगभरात सगळ्या देशांमध्ये जागतिक जल दिन साजरा करतात. यासाठी प्रत्येक वर्षी एक थेट सुद्धा ठेवण्यात येते. बघूया यावर्षीची थिम काय आहे ते. दरवर्षी पाणी दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जल परिषद आयोजित केली जाते यावर्षी २२ ते २४ मार्च या दरम्यान न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्र २०२३ ची जल परिषद होत असून , सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अधिकार हा मानवी हक्क म्हणून ओळखला जातो. यावर्षीची जल दिनाची थिम हि एक्सलरेटिंग चेंज अशी ठेवण्यात आली असून, बी द चेंज या मोहिमेअंतर्गत जल दिन साजरा केला जाणार आहे.
हे ही वाचा:
फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न
संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक
नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये
जागतिक जलदिनाचे महत्व
पृथ्वीवरील सर्व सजीवांची उत्पत्ती केवळ पाण्यापासूनच झालेली आहे. इतर ग्रहांवर सुद्धा शात्रज्ञांनी पाण्याच्या शोधाला प्राधान्य दिले आहे. ” पाणी हेच जीवन” पाणी हेच अमृत असे आपल्याकडे म्हंटले आहे. कारण पाण्याशिवाय जीवांची कल्पनाच करू शकत नाही. पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तर उर्वरित भागांमध्ये मानव, प्राणी असे कितीतरी जीव पाण्यावर अवलंबून आहेत. पण आपल्याकडे पाण्याचा अनावश्यक वापर पण होत असतो. लोकसंख्या विस्तार आणि औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापर सुद्धा वाढला आहे.