24 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषधरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

Google News Follow

Related

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटच्या सामना धरमशाला येथे खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची निवड झालेली आहे. या सामन्यात दुखापतग्रस्त के.एल. राहुलला संधी मिळालेली नाही. मात्र, रांची कसोटीत न खेळलेला जसप्रीत बुमराह टीम इंडियात परतला आहे. वॉशिंग्टन सुंदर रणजी सामना खेळण्यासाठी परतल्याने तो टीम इंडियाचा भाग नसेल. शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने एकाही नव्या खेळाडूचा समावेश केलेला नाही.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘के. एल. राहुलचा धरमशाला कसोटीतील सहभाग फिटनेस टेस्ट पास होण्यावर अवलंबून होता. पण केएल राहुल फीट नसल्याने धरमशाला कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम केएल राहुलची काळजी घेत आहे. केएल राहुललाही चांगल्या उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जसप्रीत बुमराहला रांची कसोटीपूर्वी संघातून सोडण्यात आले होते. पण जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीसाठी परतला आहे. बुमराह धरमशाला येथे टीम इंडियात सामील होणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला रणजी सामने खेळण्यासाठी सोडण्यात आले आहे. सुंदर तामिळनाडूकडून मुंबईविरुद्ध रणजी करंडक खेळणार आहे. गरज पडली तरच सुंदर शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील होईल.

हेही वाचा :

भारत आणि पाकिस्तान ९ जून रोजी भिडणार

दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी नाहीच

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

शहाजहान शेखला कोर्टाचा धक्का, १० दिवसांची पोलिस कोठडी!

मोहम्मद शमीही दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नव्हता. मोहम्मद शमीवर नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शमीला टीम इंडियात परतण्यासाठी ३ ते ४ महिने लागू शकतात. रजत पाटीदार मात्र खराब कामगिरीनंतरही शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियाशी जोडला जाणार आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गील, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप सिंग

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा