कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

आयपीएलच्या १४ व्या पर्वातील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबला ५ गडी राखून नमवून पराभवाची मालिका खंडित केली आणि शाहरुखच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर फुलली. पण या सामन्यातली विशेष लक्षवेधी घटना जास्त महत्वाची होती. कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर केला गेला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा खुलेआम कोडवर्ड्सचा वापर आणि ते ही डगआऊटमधून. हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय.

पंजाब किंग्ज संघाने ९.४ षटकांमध्ये ३ गडी गमावून ४७ धावा केल्या. डावाचे दहावे षटक वेगवान गोलंदाज प्रसिद कृष्णा टाकत होता आणि क्रीजवर पंजाबचा फलंदाज मोइसेस हेन्रीक्स फलंदाजी करत होता. कोलकाताच्या डगआऊटमधून कोडवर्ड्सच्या माध्यमातून इशारे केले गेले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोलकात्याच्या डगआऊटमधून हे कोडवर्ड्स नेमके कशासाठी वापरले गेले? का वापरले गेले? हे आणखी समोर येऊ शकलेले नाही. परंतु प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र कोलकाता संघ प्रशासनाला हा नेमका काय प्रकार आहे, याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

हे ही वाचा:

कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी

देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र

२ मे ला विजयोत्सवावर बंदी

मोदी- बायडन यांच्यात कोरोनावर चर्चा

कोलकात्याने आपल्या पराभवाची मालिका खंडित केली. कोलकात्याच्या बोलर्सने शानदार गोलंदाजी केली तसंच कर्णधार ओयन मॉर्गनने शेवटपर्यंत पाय रोवला. त्यामुळे पंजाबवर कोलकात्याने ५ गडी राखून मात केली. १६.४ षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात कोलकात्याने पंजाबने दिलेलं १२३ धावांचं माफक लक्ष्य गाठलं.

Exit mobile version