27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषकोलकात्याने घेतली मुंबईची फिरकी

कोलकात्याने घेतली मुंबईची फिरकी

Google News Follow

Related

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएलच्या सामन्यात मुंबई संघ पराभूत झाला आहे. कोलकात्याच्या फलंदाज वरूण त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर कोलकाता संघ विजयी ठरला आहे. पण कोलकात्याच्या मिस्ट्री स्पिनर्सची कामगिरी ही निर्णायक ठरली आहे.

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकली प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा या सामन्यातून कमबॅक करत होता. क्विंटन डी कॉकच्या साथीने सलामीला येत मुंबईसाठी धावसंख्येचा उत्तम पाया रचला. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली होती. पण सलामीच्या जोडीचा अपवाद वगळता मुंबईच्या उर्वरित फलंदाजांनी मात्र निराशाच केली. सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पोलार्ड, कृणाल पंड्या या मधल्या फळीला चमक दाखवता आली नाही.

मुंबईचा संघ जेमतेम १५४ धावा धावफलकावर चढवू शकला. तर कोलकाता संघाने हे आव्हान अगदी लीलया पार केले. कोलकाता कडून व्यंकटेश अय्यर आणि वरूण त्रिपाठी यांनी तुफान फटकेबाजी करत धावांचा पाऊस पडला. कोलकात्याने फक्त ३ फलंदाज गमावत ७ विकेट्सनी घवघवीत विजय मिळवला.

हे ही वाचा:

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

पण या सामन्यात कोलकाता संघाचे दोन मिस्ट्री स्पिनर्स वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरीन या दोघांनी टाकलेल्या आठ षटकांमध्ये मुंबई संघाला जास्त धावा करता आल्या नाहीत आणि तिथेच सामना फिरला. नरिनच्या याच कामगिरीसाठी त्यांला सामनावीर घोषित करण्यात आले. या सामन्यानंतर गुण तक्त्यात मुंबईचा संघ हा सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. तर कोलकाता संघाने चौथे स्थान पटकावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा