सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाताचा १० धावांनी विजय झाला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हैदराबादला कोलकाताचने दिलेले १८८ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे.
प्रथम फलंदाजी करायला आलेल्या कोलकाता संघाकडून सलामीवीर नितेश राणा याने पहिल्यापासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडत आक्रमक फलंदाजी केली. त्याने ५६ चेंडूत ८० धावांची तुफानी खेळी केली तर राहुल त्रिपाठीने फक्त २९ चेंडूत ५३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. या जोरावर कोलकाता संघाने २० षटकांत ६ बाद १८७ धाव केल्या.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’
लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह
परभाव टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पुन्हा भिजण्याचे प्रयोग
‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’
या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबाद कडून जॉनी बेरस्टोव आणि मनीष पांडेकडून चांगली खेळी केली गेली. त्या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. बेरस्टोवने ४० चेंडूत ५५ धाव केल्या तर मनीष पांडेने ४४ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हैदराबाद संघाला २० षटकांत ५ बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली.