कलकत्त्याला विजयाची (रा)हुलकावणी

कलकत्त्याला विजयाची (रा)हुलकावणी

कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२१ चा पाचवा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमी धाव करून देखील शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये मतच जिंकावली. या विजयाचा शिल्पकार हा खऱ्या अर्थाने राहुल चहर ठरला.

सामन्याची सुरवात ही मुंबईच्या फलंदाजीने झाली. मुंबईच्या फलंदाजीची सुरवात अडखळती झाली होती, कारण सलामीवीर क्विंटन डी कॉक हा अवघ्या दोन धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अकराव्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव बाद झाला आणि मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. बघता बघता मुंबई इंडियन्सचे सर्व गाडी बाद होत गेले. वीस ओव्हर्सच्या शेवटी मुंबई इंडियन्सचा स्कोर हा केवळ १५२ राहिला होता. कलकत्ता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलने केवळ १५ धाव देऊन मुंबईचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

पुढील पंधरा दिवस काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

योगी आदित्यनाथ विलगीकरणात

कलकत्ता नाईट रायडर्सची सुरवात ही दणक्यात झाली. शुभमन गिल आणि नितीश राणा या सलामीवीरांनी अवघ्या ९ ओव्हर्समध्ये ७२ धाव केल्या. अकराव्या ओव्हरला दोन्ही संघ हे बरोबरीला होते. कलकत्त्याच्या स्कोर हा ८५-२ असा झाला होता. शेवटच्या पाच ओव्हर्स बाकी असताना कलकत्ता नाईट रायडर्सला केवळ ३१ धाव हव्या होत्या. तिथून राहुल चहरने राणाला बाद केले आणि सामना फिरवला. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये कृणाल पांड्या, बुमराह आणि बोल्टच्या भेदक माऱ्याने मुंबईला विजय मिळवून दिल्या.

Exit mobile version