पावसाच्या व्यत्यतात कोलकात्याकडून मुंबईचा पराभव!

आयपीएल २०२४मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ

पावसाच्या व्यत्यतात कोलकात्याकडून मुंबईचा पराभव!

पाचवेळा आयपीएलविजेत्या ठरलेल्या मुंबई संघाला यंदाच्या हंगामात सूर गवसलेला नाही. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला आणि २०२१नंतर पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये गेलेला संघ ठरला.

कोलकात्याने मुंबईपुढे १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईचा संघ आठ विकेट गमावून १३९ धावांतच गारद झाला. सलामीवीरांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे मुंबईची धावसंख्या शून्य बाद ६५ अशी होती. मात्र नंतर मुंबईची अवस्था दोन बाद ६७ अशी झाली. सुनील नारायणने इशान किशनला बाद केले तर, रोहित शर्माला वरुण चक्रवर्तीने.

हे ही वाचा:

सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!

महाराष्ट्रात कोण भारी?

लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

आपली पांडवांची सेना आहे, तर ते कौरव!

पावसामुळे सामना १५ मिनिटे उशिरा सुरू झाला. तिलक वर्मा (३२) आणि नमन धीर (१७) वगळता कोणीही चमकदार खेळी करू शकला नाही. सूर्यकुमार यादवला अँड्रे रसेलने बाद केले.मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने १६ षटकांत सात विकेट गमावून १५७ धावा केल्या. कोलकात्यासाठी व्यंकटेश अय्यरने सहा चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावा केल्या.

मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि अमित मिश्रा यांनी दोन-दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने हार्दिक पांड्याला बाद केले. तो दोन धावाच करू शकला. पावसामुळे सामना १६ षटकांचा खेळवण्यात आला. मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक ४० धावा केल्या. वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल व हर्षित राणा याने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. वरुणला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Exit mobile version