‘आजपासून सुमारे ४८ वर्षांपूर्वी जेव्हा मी १९७६मध्ये वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्यास गेलो तेव्हा पहिल्या नजरेतच मला कळून चुकले की हे मंदिरच आहे. अर्थात अनेकांनी या सत्याला नाकारण्याचे प्रयत्न केले. अन्यथा राममंदिराचा प्रश्न २०१९मध्ये नव्हे तर अनेक वर्षांपूर्वीच सुटला असता. खोदकामात मिळालेला प्रत्येक पुरावा हेच सांगतोय की, ते मंदिर वादग्रस्त जागेपेक्षा अनेकपट विशाल असेल,’ हे म्हणणे आहे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उत्तर शाखेचे संचालक आणि या वादग्रस्त अवशेषांच्या सर्वेक्षण मोहिमेचे सदस्य के. के. मोहम्मद यांचे.
प्राणप्रतिष्ठेला मोहम्मद यांनाही आमंत्रण मिळाले आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘मी अयोध्येत काम करत असताना लोकांना थंडी, उष्मा आणि पावसातही येताना बघितले आहे. तेव्हा तिथे मंदिर नव्हते, केवळ आस्था होती. तो ५०० वर्षांचा लढा होता, जो आता संपला आहे. हिंदुस्थानींच्या हृदयावर आघात होता. मात्र आता छान वाटत आहे. या विशाल कामासाठी श्रीप्रभू रामाने खारीच्या वाट्याच्या कामासाठी मला निवडले. त्यांचे आभार,’ अशा शब्दांत मोहम्मद यांनी समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा:
राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!
१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!
मंदिराचे महत्त्वाचे पुरावे कधी मिळाले?
‘सन १९७६मध्ये प्राध्यापक बीबी लाल यांच्या नेतृत्वाखालील आमचे विद्यार्थ्यांचे पथक अयोध्येला पोहोचले. तेव्हा आम्हाला या वादग्रस्त जागी १२ खांब दिसले. ते १२व्या शतकातले दिसत होते आणि त्यांच्यावर मंदिराशी संबंधित पुरावे होते. देवी-देवतांचे चित्रही होते. मात्र त्यांचे चेहरे खराब झाले होते. मंगलकलशही दिसत होते. हाच महत्त्वाचा पुरावा होता. त्यानंतर महत्त्वाचा पुरावा सन २००३मध्ये डॉ. बीआर मणी यांच्या संशोधनपथकाला मिळाला. तेव्हा मंदिरात होणाऱ्या अभिषेकाशी संबंधित महत्त्वाच्या वस्तू आढळल्या. शीलालेख मिळाले, ९० खांब मिळाले, त्यावर कधी विशाल मंदिर उभे होते. २१६हून अधिक टेराकोटाच्या मूर्तीही मिळाल्या,’ असे मोहम्मद यांनी सांगितले.