रामजन्मभूमी मंदिराबाबतच्या तपासानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ केके मोहम्मद म्हणाले की, मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही इदगाह मशिदी हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात.आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
केके मोहम्मद २०१२ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या उत्तर विभागाचे प्रादेशिक संचालक होते.केके मोहम्मद १९७६ मध्ये बाबरी मशिदीचे उत्खनन करणाऱ्या बीबी लाल यांच्या टीमचा भाग होते.
ज्ञानवापी-शाही ईदगाहबद्दल मुस्लिमांमध्ये भावना नाहीत
ज्ञानवापी आणि मथुरेच्या शाही ईदगाहशी संबंधित प्रश्नावर केके मोहम्मद म्हणाले की, त्यांना हिंदूंच्या ताब्यात देणे हा या समस्येवर एकमेव उपाय आहे. सर्व धर्मगुरूंनी संघटित होऊन या वास्तू हिंदू समाजाच्या ताब्यात द्याव्यात. काशी, मथुरा आणि अयोध्या हिंदूंसाठी खूप खास आहेत कारण ते भगवान शिव, भगवान कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. येथे बांधलेल्या मशिदींबद्दल मुस्लिमांच्या भावना नसल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!
राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!
पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!
उत्खनामध्ये सापडलेल्या खांबांवर हिंदूंची शिलालेख
बाबरीचे उत्खनन करणाऱ्या संघाचे प्रमुख प्राध्यापक बीबी लाल होते.त्यावेळी के के मोहम्मद प्राध्यापक बीबी लाल यांच्या टीममध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होते. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत पहिल्यांदा उत्खनन झाले तेव्हा तेथे अनेक खांब सापडले.त्यातील अनेक खांबांवर हिंदू मंदिरांसारखे शिलालेख होते. इमारतीच्या भिंतींवर हिंदू देव-देवतांची शिल्पे होती, जी अनेक ठिकाणी तुटलेली होती. आम्हाला तेथे प्राणी, स्त्रिया, योद्धे आणि बरेच काही यांचे टेराकोटा शिल्प देखील सापडले.
प्रो. लाल यांना उत्खननाचे निकाल जाहीर करायचे नव्हते कारण की, निकाल जाहीर केल्याने समाजात मोठा वाद निर्माण होईल असे त्यांना वाटत होते.परंतु प्रोफेसर इरफान हबीब यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट इतिहासकारांनी प्रसारमाध्यमांमध्ये डॉ लाल आणि त्यांच्या टीमला उत्खननातून काहीही सापडले नाही, असे विधान केले.यानंतर प्राध्यापक लाल यांना उत्तर द्यावे लागले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य सांगितले.दरम्यान, २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी केके मोहम्मद यांनाही निमंत्रण मिळाले.परंतु ते कार्क्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.सततच्या आजारांमुळे ते सोहळ्याला जाणार नाहीत.