माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, ईडीने बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली असून ईडीने गुरुवारी यासंबंधी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून कागदपत्राची मागणी केली आहे.
कोरोना काळात बॉडी बॅग खरेदी प्रकरणात झालेल्या घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गेल्याच आठवड्यात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी आणि बॉडी बॅगचे कंत्राट देण्यात आलेली वेदांत या खाजगी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
पंजाबात पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान
पंतप्रधानांनी अशा उडविल्या अविश्वासाच्या ठिकऱ्या
कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू
या गुन्ह्याचा अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने या प्रकरणात परस्पर तपास सुरू केला आहे, गुरुवारी ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या गुन्ह्याचा तपासाचा तपशील घेतला आहे, तसेच या संदर्भातील कागदपत्राची ईडीकडून मागणी करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून लवकरच या गुन्ह्याचे कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे कळते.
या कागदपत्राच्या आधारे ईडीकडून लवकरच मनीलाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता असून या प्रकरणात चौकशी करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांना समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.