…त्या बाळाचे पालक आता मुंबईच्या महापौर!

…त्या बाळाचे पालक आता मुंबईच्या महापौर!

सहा दिवसापूर्वी बीबीडी चाळीत झालेल्या सिलेंडर स्फोटामधील तिसऱ्या पीडितेचाही काल मृत्यू झाला आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आता अनाथ झाला. त्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या आठवड्यात चार महिन्यांचा मंगेश आणि त्याचे वडील आनंद पुरी (२७) यांचा मृत्यू झाला होता. बाळाची आई विद्या पुरी (२५) यांच्यावर बीएमसी संचालित कस्तुरबा रुग्णालयात उपचार चालू होते. तिचाही काल मृत्यू झाला आहे. आता पाच वर्षांचा विष्णू हा त्याच्या कुटुंबातील एकटाच सदस्य उरला आहे.

तो १५-२० टक्के भाजलेला असून, त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बाळाच्या वयानुसार त्याच्यावर उपचार चालू आहेत. बाळ आता वाचेल आणि त्या बाळाचे पालक आम्हीच असू.’ असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

शिवसेनेचे यूपीएच्या दिशेने पहिले पाऊल

केरळमध्ये ‘मैं बाबरी हूँ’ बिल्ले वाटून मुलांमध्ये पसरवत आहेत द्वेष

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब

‘डॉक्टर आणि परिचारिकांना सौजन्याने वागण्याचे, ध्यानधारणेचे प्रशिक्षण द्या’

 

गेल्या आठवड्यात जेव्हा स्फोट झाला तेव्हा सर्व पीडितांना नायर रुग्णालयात उपचारांसाठी नेले होते. पण रुग्णालयात तासाहून अधिक काळ उपचार मिळाले नाही. संपूर्ण कुटुंब मदतीसाठी याचना करत होते.  पीडित भयानक वेदनांनी ओरडत होते. ४ महिन्यांचे लहान बाळ सतत रडत होते. मात्र रुग्णालयात त्यांच्यावर तात्काळ उपचार झाले नाहीत. आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आम्ही पाहून एका परिचारिकेला वेळेवर हजार न राहिल्याने निलंबित केले आहे आणि इतर माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करू, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Exit mobile version