संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन

संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन

ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे. कीर्ती शिलेदार या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्यसंगीताचा वारसा त्यांनी वाढवला आणि पुढे नेला. संगीत नाटकांना उतरती कळा लागल्यानंतर जयराम शिलेदार यांच्यासोबत कीर्तीताई यांनीही मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहील. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते.

हे ही वाचा:

मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी

एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन

मोदी का ठरले बेस्ट पीएम?

किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर चार हजारहून अधिक प्रयोग झाले. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा वारसा जपताना मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली. २०१८ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

Exit mobile version