केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, संसदेत वक्फ विधेयक मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच्या (३१ मार्च) पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सरकार विधेयकातील तरतुदींशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. या विधेयकात अशी कोणतीही तरतूद नाही जी अल्पसंख्याकांवर अन्यायकारक असेल. ते म्हणाले, वक्फ विधेयकाला विरोध करणारे शक्तिशाली लोक आहेत. त्यांनी वक्फच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. ते जनतेची दिशाभूल करत आहेत आणि हे विधेयक असंवैधानिक असल्याचे बोलत आहेत.
प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी काही आधार असला पाहिजे, असे मंत्री रिजिजू म्हणाले. हे विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल.
वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत काही लोकांकडून दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर त्यांनी आक्षेप घेत टीका केली. रिजिजू यांनी त्याचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केला आणि सांगितले की, या कायद्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यात १९१३, १९२३, १९३१, १९५४, १९९५ आणि २०१३ यांचा समावेश आहे. हा कायदा इतका जुना आणि स्थिर आहे की त्याला असंवैधानिक आणि बेकायदेशीर म्हणणे हे मोठे खोटे आहे. या देशाला एक संविधान आणि कायदा आहे आणि कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिसकावून घेणे शक्य नाही, असे रिजिजू म्हणाले.
संसदेत या विधेयकावरील चर्चा शांततेत आणि विचारपूर्वक होईल अशी आशा रिजिजू यांनी व्यक्त केली. त्यांनी गोंधळ आणि खोटे आरोप टाळण्याचे आवाहन केले आणि सांगितले की समाजात शांतता आणि बंधुता वाढवण्यासाठी मुद्द्यांवर योग्य आणि तथ्यात्मक माहिती देणे आवश्यक आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेसाठी आणले जाईल आणि सरकार या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखेल.
हे ही वाचा :
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की ऑगस्ट २०२४ मध्ये संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवलेले वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा सादर केले जाईल. ते म्हणाले, ‘आम्ही या अधिवेशनातच वक्फ विधेयक मांडू.’ दरम्यान, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपणार आहे.
गृहमंत्री शाह पुढे म्हणाले, प्रस्तावित कायद्याला कोणीही घाबरण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी सरकार संविधानाच्या कक्षेत राहून वक्फ कायद्यात सुधारणा करत आहे. ते म्हणाले, ‘विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. मुस्लिमांचे कोणतेही अधिकार हिरावले जाणार नाहीत. ते फक्त खोटे बोलत आहेत.