क्रीडामंत्री किरण रिजिजू का रागावले?

क्रीडामंत्री किरण रिजिजू का रागावले?

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यात काही गैरसमज झाल्याचा परिणाम म्हणून किरेन रिजीजू यांनी एका उच्चस्तरिय बैठकीत वॉक-आऊट केला. टोकियो इथे होणाऱ्या ऑलिंपिकच्या संदर्भातील तयारीची पाहणी करण्यासाठी ही बैठक बोलावली गेली होती.

टोकियोमध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला केवळ दोनच पदके जिंकता आली होती. त्यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी पुढील ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अधिक चांगली कामगिरी होईल असे अश्वासन दिले होते.

हे ही वाचा:

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच कॅफे

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

या वेळच्या ऑलिंपिकसाठी अनेक खेळाडूंना ऑलिंपिकसाठी पात्र होण्याची संधी आहे. कोरोनामुळे अनेक वेगवेगळ्या स्पर्धा रद्द होत आहेत. मागील महिन्यात जागतिक रिले स्पर्धेत भारताला सहभागी होता आले नव्हते, त्याबरोबरच हॉकीच्या स्पर्धेतील भारताचा सहभाग राहिला नव्हता. मलेशिय ओपन आणि सिंगापूर ओपन देखील अशाचप्रकारे कोरोनामुळे रद्द झाल्या होत्या.

या बैठकीत क्रीडा क्षेत्राशी निगडीत विविध संस्थांनी एकत्र येऊन खेळाडूंच्या ऊत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करावेत अशी सुचना रिजीजू यांनी केली होती. मात्र या वाक्यावरून रिजीजू आणि बात्रा यांच्या गैरसमज झाला. परिणामतः रिजीजू संतापून बैठकीतून निघून गेले.

रिजीजू यांच्या व्यतिरिक्त, एसएआय संचालक संदीप प्रधान, ॲथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक आदिल सुमारीवाला, सह-सचिव- क्रीडा एल एस सिंग, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि गगन नारंग यांचा समावेश होता.

Exit mobile version