महाराष्ट्रात सध्या समाज माध्यमांवर अभिनेता किरण माने हे चांगलेच चर्चेत आहेत. ‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाह वरील मालिकेत किरण माने भूमिका करत होते. पण या मालिकेतून माने यांची हकालपट्टी करण्यात आली. किरण माने हे समाज माध्यमातून राजकीय भूमिका घेत असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचा निष्कर्ष काढत यावर खूप चर्चा होऊ लागली. माने यांनी देखील या निष्कर्षाला दुजोरा देणारी वक्तव्ये केली. पण आता या संपूर्ण प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. माने यांच्या हकलपट्टीचे कारण त्यांच्या राजकीय भूमिका नसून व्यावसायिक कारणांनी त्यांना काढून टाकण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने या संबंधातील वार्तांकन केले आहे. त्यामुळे माने यांनी प्रसिद्धीसाठी हा सर्व कांगावा केला का? असा सवाल विचारला जात आहे.
पॅनरोमा एंटरटेनमेंट या कंपनीतर्फे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. सुझाना घई या मालिकेच्या निर्मात्या आहेत. माने यांच्या हकलपट्टी बाबत बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने घई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी यासंबंधी बोलायला नकार दिला. पण नंतर या विषयात आपले मत मांडताना किरण माने यांना काढण्या मागचे कारण व्यावसायिक होते असे त्यांनी सांगितले. माने यांना या बाबतीत अनेकदा कल्पना दिली होती त्यांना सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी
मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी
ब्रिटनची धुरा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती?
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
किरण माने यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यामागे माने यांची राजकीय मते आणि भूमिका असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. यावरून बराच कांगावाही करण्यात आला. माने यांच्या समर्थकांकडून #istandwithkiranmane असा हॅशटॅगही चालवला गेला. पण मालिकेच्या निर्मात्यांनी या सर्व प्रकरणातील सत्यता समोर आणल्यामुळे माने यांचे समर्थक तोंडघशी पडले आहेत.