स्टार प्रवाह मधील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून हकालपट्टी करण्यात आलेला अभिनेता किरण माने याच्या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. किरण माने याने आपल्याला राजकीय भूमिका घेतल्यामुळे काढण्यात आल्याचा कांगावा केला असला तरी देखील त्याला काढण्या मागचे खरे कारण व्यवसायिक असल्याचा दावा वाहिनीकडून करण्यात आला होता. तर आता मालिकेतील महिला सहकलाकार यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळेच किरण माने याची हकालपट्टी झाल्याचा नवा खुलासा पुढे आला आहे. मालिकेतील इतर कलाकारांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मानेच्या गैरवर्तणूकचा पाढा वाचला आहे.
किरण माने हा मालिकेतील सहकलाकारांशी आणि त्यातही विशेषतः महिला सहकलाकारांशी अतिशय चुकीच्या प्रकारे वागत होता. उद्धटपणे बोलणे, टोमणे मारत बोलणे अशा प्रकारचे मानेचे वागणे होते. तो स्वतःला या मालिकेचा नायक समजायचे. तर माझ्याशिवाय ही मालिका चालू शकत नाही ही मालिका माझ्यामुळेच आलेली आहे असा त्याचा दावा असायचा. तर सहकलाकारांना तो मालिकेतून काढून टाकण्याचा धमक्याही देत होता. मालिकेतील महिला कलाकारांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तर माने दावा करतो तसे त्याच्या राजकीय लिखाणामुळे त्याला काढण्यात आलेले नाही किंवा मालिकेचे शुटींगही बंद पाडण्यात आलेले नाही.
हे ही वाचा:
किरण मानेचे मालिका निर्मात्यांवर नवे आरोप!
दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
‘वडेट्टीवारांनी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे’
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली
त्याच्या या वर्तणूकी बाबत मालिकेतील कलाकारांनी निर्मात्यांकडे तक्रार केली होती. वारंवार येणाऱ्या या तक्रारीवरून माने याला याबाबत वॉर्निंग देण्यात आली होती. तरिदेछील मानेच्या या वागणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळेच मानेला काढून टाकण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.