गेल्या दोन दिवसापासून अभिनेता किरण माने चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून डच्चू दिल्यामुळे किरण आणि चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणात आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळेच आपल्याला मालिकेतून काढून टाकण्याचा आरोप किरण माने याने केला होता. यासंबंधी आता माने याने नवे आरोप केले आहेत. आपल्या विरोधात विधान करण्यासाठी मालिकेचे निर्माते इतर कलाकारांवर दबाव टाकत असल्याचा दावा किरण मानेने केला आहे या संदर्भात माने याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये मालिकेच्या सेटवर माध्यमांचे प्रतिनिधी जाणार असून त्यांच्याशी बोलताना माझ्या विरोधात विधाने करण्यासाठी कलाकारांवर दबाव आणला जात आहे असे किरण मानेचे म्हणणे आहे.
काय आहे किरण मानेची फेसबूक पोस्ट?
“आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..
… आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !
पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !
मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !
तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!
– किरण माने.”
हे ही वाचा:
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची वर्षपूर्ती
दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
‘वडेट्टीवारांनी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे’
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली
पण किरण माने याचे हे दावे खोटे असल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. किरण माने याच्या वर्तणुकीमुळेच त्याची हकालपट्टी करण्यात आल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात माने याला वारंवार वॉर्निंग देऊनही त्याच्या वागणुकीत सुधारणा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.