मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात लव्ह जिहादच्या माध्यमातून २० वर्षांच्या तरुणीवर दीड वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अर्शदने महिलेचे अश्लील व्हिडिओही रेकॉर्ड केले आहेत. त्याने स्वत:ची ओळख “भय्यू” अशी करून दिली आणि सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली होती. २२ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुप भार्गव यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे दोषीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
यातील पिडीत ही मुळची बामोरीची आहे. तिचे वडील आजरी आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ति गुणा येथे आली आणि खासगी कंपनीत कामाला लागली. २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर एका तरुणाशी माझी मैत्री झाली. त्याने मला त्याचे नाव भय्यू असल्याचे सांगितले. तोच आयडी त्याने सोशल मीडियावरही वापरला होता. त्यांच्यात संवाद सुरु झाला. बेत सुरु झाली. अनेक फोटोज एकत्र काढले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. अश्लील व्हिडीओ काढला. आणि त्यानंतर छळ सुरु केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्याच्याकडून रोज छळ सुरु होता.
हेही वाचा..
नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!
जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!
सुमारे ३ महिन्यांपूर्वी तिला त्याच्या मोबाइलवर अनेक मुस्लिम तरुणांचे संपर्क सापडले आणि जेव्हा तिने त्याची चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आले. त्याने तिला आपले खरे नाव अर्शद असल्याचे सांगितले. त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्याने तिला जीन्स घालण्यास मनाई केली आणि मला सलवार कुर्ता आणि बुरखा घालण्याचा आदेश दिला. त्याने लग्न करण्यासाठी दबाव टाकला. मागील दीड वर्षे तिने अर्शदच्या अत्याचाराखाली घालवली आहेत. अर्शदने तिला बाजारपेठत मारहाण केली.
२१ जून रोजी तिला हिंदू जागरण मंचबद्दलची माहिती मिळाली. तेव्हा तिने हिंदू जागरण मंचचे जिल्हा समन्वयक दिलीप कुमार रजक यांच्याशी संपर्क साधला आणि तिला तिची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.