बंदुक, बॉम्ब, क्षेपणास्त्रावरून आता कोरियन मुलांची नावे

कोरिया मध्ये जारी केलेल्या फर्मानाच्या अनुसार आता सर्व कोरियन बाळांची नावे बंदूक, बॉम्ब आणि उपग्रह वरच ठेवली पाहिजेत.

बंदुक, बॉम्ब, क्षेपणास्त्रावरून आता कोरियन मुलांची नावे
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोन उन आपल्या विचित्र निर्णयांमुळे ओळखले जाते.आता पुन्हा एकदा त्यांनी एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे. कोरिया मध्ये जारी केलेल्या फर्मानाच्या अनुसार आता सर्व कोरियन बाळांची नावे बंदूक, बॉम्ब आणि उपग्रह वरच ठेवली पाहिजेत. त्यांनी मुलांचं नावं  एका थीमनुसार ठेवण्यास सांगितले आहे
उत्तर कोरियातील मुलांची नावे मवाळ नसावीत, अशी इच्छा किम जोंग उन यांनी व्यक्त केली आहे. या देशात मुलांची नावे बॉम्ब, बंदुका, क्षेपणास्त्राची  असावीत. मुलांची ही नावे प्रेमळपणापेक्षा देशभक्तीची भावना दर्शवतात असे त्यांना वाटते. मुलांच्या नावाला देशभक्तीची जोड दिली तर पुढे देशाला उपयोग होईल असं विधान सुद्धा दिलं . देशातील  रेडिओ फ्री एशियाच्या अहवालानुसार, ए री (प्रिय व्यक्ती), सो रा (शंख शिंपला) आणि सु मी (सुपर ब्युटी) यांसारखी सौम्य नावे असलेल्या नागरिकांना अधिक वैचारिक काम करण्यास भाग पाडले जात आहे. काही वर्षां पूर्वी , उत्तर कोरियन लोकांना त्यांच्या मुलांना चुंग सिम (निष्ठा), चोंग इल (बंदूक), पोक इल (बॉम्ब) किंवा उई सॉन्ग (उपग्रह) यांसारखी नावे देण्यास प्रोत्साहित केले जात होते. आणि आता ते पूर्ण केलं जात आहे.

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

हुकूमशहा किम जोंग उनच्या नव्या आदेशाने उत्तर कोरियातील नागरिक हैराण झाले आहेत. कारण अधिकारी त्यांना मुलांची नावे बदलण्यास सांगत आहेत. गेल्या महिन्यातील आदेशानंतर ही प्रक्रिया सुरू झाली असून, नागरिकांकडून मुलांची नावे बदलण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात आहे.
Exit mobile version