मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडूंपैकी एक मानला जातो. मूळचा वेस्ट इंडियन असणारा पोलार्ड हा जगभरातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळतो. बहुतांश वेळा पोलार्ड हा आपल्या खेळातून छाप ठेवून जातो. कधी तो फलंदाजीतून मोठे फटके खेळून चमक दाखवतो, तर कधी गोलंदाजीतून विकेट्स घेऊन संघाला सहाय्यक ठरतो. आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणानेही तो संघाला सहाय्यक ठरतो. त्यामुळेच जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडूंमध्ये त्याचा नंबर खूप वरचा लागतो. टी-२० क्रिकेट मधील त्याचे आकडेही याची पुष्टी करताना दिसतात.
मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना कायरन पोलार्डने आपल्या नावे एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे अशी विक्रमी कामगिरी करून दाखवणारा पोलार्ड हा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीसाठी जगभरातील क्रिकेट रसिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
‘गुलाब’ चक्रीवादळामुळे १६ जणांनी गमावले प्राण; जनावरे, घरांचेही झाले मोठे नुकसान
मागण्या पूर्ण करा नाहीतर कामबंद; ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा पवित्रा!
पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!
कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना
पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना पोलार्डने या सामन्यात केवळ एक षटक टाकले. हे ६ चेंडू संपूर्ण सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरले. या एका षटकात पोलार्डने पंजाबचा कर्णधार के.एल राहुल आणि क्रिस गेल या दोघांना बाद केले. मुंबई संघाच्या दृष्टीने या दोन्ही विककेट्स महत्त्वाच्या ठरल्याच पण पोलार्डच्या वैयक्तिक विक्रमाच्या दृष्टीनेह अत्यंत मौल्यवान ठरला. पोलार्डने आपल्या टी-२० कारकिर्दीतील ३०० पेक्षा जास्त विकेट घेण्याची किमया करून दाखवली. तर त्याच्या नावावर टी-२० मध्ये दहा हजार पेक्षा अधिक धावा आहेत. ही कामगिरी साध्य करणारा पोलार्ड हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या कामगिरीमुळे स्पष्ट होते की त्याला टी-२० प्रकारातील लॉर्ड का म्हटले जाते.