राजीव गांधी नव्हे; आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी नव्हे; आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “”खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने  करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल.”

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी ३९ गोल केले होते.

हे ही वाचा:

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार का?

लोकल प्रवास नाकारणारे जनविरोधी ठाकरे सरकार

भाजपाच्या रेलभरो आंदोलनाचा मुंबईत एल्गार

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात १९९१-९२ मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ अमस्टर्डम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Exit mobile version