इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव

इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव

इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव शनिवारी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंडी आघाडीच्या नेत्यांनी जागावाटप, भारत जोडो न्याय यात्रा आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी एक बैठक ऑनलाईन घेतली, त्यावेळी या विषयावर चर्चा झाली.

हेही वाचा..

प. बंगालच्या पुरुलियामधील साधूंवरील हल्ला पालघरच्या हत्याकांडासारखा

मॉल्स, दुकानांमध्ये ख्रिसमस ट्रीप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्याचे आदेश

अरविंद केजरीवालांना ईडीचं चौथं समन्स

दरम्यान संयोजकपदासाठी नितीश कुमार यांचेही नाव पुढे आले होते मात्र त्यांच्या पक्षाने ते कोणत्याही पदावर नसल्याचे सांगितले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयोजकपदावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.  मागील एका बैठकीत डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जी यांनी खर्गे यांना आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. शुक्रवारी खर्गे यांनी अनेक राज्यांतील पक्षाच्या लोकसभा समन्वयकांची बैठक घेतली आणि त्यांना लोकांशी संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. पहिली बैठक गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवसाठी आयोजित करण्यात आली होती.

 

Exit mobile version