खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’

भाजपकडून पुन्हा काँग्रेस लक्ष्य

खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या ‘देशासाठी दान’ या सार्वजनिक निधी उभारणी मोहिमेसाठी एक लाख ३८ हजार रुपयांची देणगी दिली. मात्र काँग्रेसच्या या मोहिमेवर टीका करणाऱ्या भाजपने खर्गे यांनाही लक्ष्य केले आहे.
काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निधी उभारणीची ‘देशासाठी दान’ मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी एक लाख ३८ हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी देण्याची प्रक्रिया सुरू असताना खर्गे यांनी विनोदाने ‘एक महिन्याचा पगार गेला’, असे म्हटले आहे. हीच व्हिडीओ क्लिप भाजपने व्हायरल केली असून त्याच्या मागे ‘मोए मोए’ हे गाणे ऐकू येत आहे. हे व्हिडीओ क्लिप देऊन भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘देशाची लूट केल्यानंतर आते ते लोकांकडे देणग्या मागत आहेत, परंतु त्यांचा अभिनिवेश बघा,’ अशा शब्दांत भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.

हे ही वाचा:

चीनमधील भूकंपात १११ ठार; २३० जखमी!

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

लोकसभेत टेलिकॉम विधेयक सादर

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा
‘देशासाठी दान’ मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील कोणीही भारतीय नागरिक किमान १३८ रुपये आणि त्या पटीने रक्कम दान करू शकतो. म्हणजे १३८०, १३ हजार ८०० रुपये आणि अशा पटीने रक्कम दान केली जाऊ शकते, असे काँग्रेसनेते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत या मोहिमेची माहिती देताना जाहीर केले होते. सन १९२०-२१मध्ये महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक ‘टिळक स्वराज निधी’ सुरू केला होता. याच ऐतिहासिक मोहिमेने प्रेरित होऊन काँग्रेसने ही सार्वजनिक निधी उभारणीची मोहीम सुरू केल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

Exit mobile version