कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!

मारहाणीचे व्हिडीओ वायरल, सर्व स्तरावरून निषेध

कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!

कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिरावर आणि तिथे उपस्थित असलेल्या भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला आहे. ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानींनी भाविकांवर हल्ला केला. हिंदू फोरम कॅनडाने आपल्या ट्वीटर हँडलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खलिस्तानी हातात पिवळे झेंडे घेऊन मंदिर परिसरात गोंधळ घालताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये काही खलिस्तानी हिंदू भाविकांवर लाठीहल्ला करताना दिसत आहेत.

हिंदू फोरम कॅनडाने हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आणि लिहिले, ‘खूप त्रासदायक चित्रे. ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानवाद्यांनी भाविकांवर हल्ला केला आहे. हे अस्वीकार्य आहे.’ हिंदू फोरम कॅनडाने या पोस्टमध्ये ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन, स्थानिक पोलिस, ओंटारियोचे प्रीमियर डग फोर्ड आणि पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना देखील टॅग केले आहे.

हे ही वाचा :

‘नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन’

धक्कादायक! १३ वर्षीय मुलाच्या पोटात आढळल्या काच, नट-बोल्ट, बॅटरीसारख्या ५६ वस्तू

भारताची न्यूझीलंडपुढे सपशेल शरणागती, कसोटी मालिकेत ०-३ हार

कॅनडाने आता अधिकृतपणे भारताला ‘राज्य शत्रू’ म्हणून संबोधले

भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरावरील हल्ल्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीटरवर पोस्टमध्ये लिहिले की, ‘कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिराच्या आवारात खलिस्तानींनी हिंदू-कॅनेडियन भाविकांवर केलेला हल्ला हा, निर्लज्ज खलिस्तानी हिंसक अतिरेकी बनला आहे हे दर्शविते.

कॅनडाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version