कॅनडात खलिस्तानी ‘गुंडांची’ दहशत

भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांनी सांगितला हल्ल्य्याचा किस्सा

कॅनडात खलिस्तानी ‘गुंडांची’ दहशत

कॅनडातून परत बोलावण्यात आलेले भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांनी गुरुवारी एक भयावह घटना सांगितली ज्यात खलिस्तानी हल्लेखोरांनी अल्बर्टा येथे त्यांच्या पत्नीसोबत असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता.
वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत संजय वर्मा यांनी वर्णन केले की खलिस्तानी “गुंड” त्यांना जखमी करण्यासाठी कसे अंगावर आले. त्यांनी तलवार चालवली. काही वेळा ते आम्हाला शारीरिक इजा करण्यासाठी खूप जवळ आले होते. त्यांच्या हातात तलवार होती, ती किरपाण नव्हती. मी अल्बर्टामध्ये असताना माझ्या शरीराच्या जवळपास २-२.५ इंच जवळ तलवार आली होती.

संजय वर्मा म्हणाले की, खलिस्तानींनी एक्झिट गेटला घेरले आणि हल्ला केला. मी अल्बर्टा शहरात होतो. तिथे भारतीयांची डिनर पार्टी होती त्यात सांस्कृतिक कार्यक्रमही होते. तिथे मी भारतीयांना भेटेन अशी अपेक्षा होती. त्यामुळे कॅनडातील अनेक व्यापारी तिथे होते.

हेही वाचा..

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!

भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

 

बाहेर जवळपास १५० लोक होते. जे खलिस्तानच्या नावाने वाईट कृत्य करत होते. त्यांनी मला ज्या प्रवेशद्वारातून जायचे होते त्या प्रवेशद्वाराला वेढा घातला. मी प्रवेश केला तेव्हा तेथे आरसीएमपी आणि स्थानिक पोलिस होते. वर्मा पुढे म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी नंतर चौकशी केली आणि त्यांना त्याबद्दल तपशील देण्यात आला नाही. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना मागे ढकलले. त्यांची चौकशीही केली. मला अंतिम निकालाची माहिती देण्यात आली नाही. आम्ही कॅनडाच्या ग्लोबल अफेअर्सलाही या घटनेची माहिती दिली. हे योग्य नाही, असा त्यांचाही विश्वास होता.

वर्मा म्हणाले की खलिस्तानी गुंड शांतताप्रिय इंडो-कॅनडियन लोकांना धमकावत आहेत आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करतात. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणातील हितसंबंध असलेला व्यक्ती असल्याचे देशाने सांगितल्यानंतर वर्मा यांना कॅनडातून परत बोलावण्यात आले. तथापि, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी ओटावाने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले.

 

Exit mobile version