पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात खलिस्तानी कट रचताना दिसत आहेत.दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाब राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना प्रजासत्ताक दिनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
यापूर्वी पन्नूने उत्तरप्रदेशातील अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला लक्ष करण्याची धमकी दिली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
हे ही वाचा:
अयोध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात!
मालदीवचे भारतीय सैनिक सरकारच्या सूचनांच्या प्रतीक्षेत
‘इंडिगो कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली असती तर…’
दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती
मान यांच्यावर हल्ला करण्यासाठी पन्नूने गुंडाना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.पंजाबमध्ये बदमाशांवर कडक कारवाई केल्यामुळे ही धमकी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.मात्र, याबाबत पंजाब पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
न्यूज १८च्या बातमीनुसार, पन्नून याने मुस्लिमांना राम मंदिर सोहळ्याला विरोध करण्याचे आवाहनही केले होते.पंतप्रधान नरेंद मोदी मुस्लिमांचे शत्रू म्हटले होते, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे.दरम्यान, भारताने २०२० मध्ये गुरपतवंत सिंग पन्नून याला दहशतवादी म्हणून घोषित केले. खलिस्तानच्या लढ्यासाठी गुरपतवंत सिंग पन्नून पंजाबमधील गुंड आणि तरुणांना भडकवण्याचे काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.