खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक!

एनआयएची कारवाई

खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक!

राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक केली आहे. बलजीत सिंग दुबईहून दिल्लीला येत होता, दिल्ली विमानतळावर पोहोचताच एनआयएने त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, बलजीत सिंग हा गुंड अर्श डल्लाचा खास असल्याची माहिती आहे.

खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंग अनेक गुन्ह्यांमध्ये हवा होता. त्याच्यावर दहशतवादी घटनांसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी महिन्यात बलजीत सिंगविरुद्ध एलओसीही उघडण्यात आली होती. त्यानंतर जून २०२४ मध्ये न्यायालयात त्याच्याविरुद्ध वॉरंटही जारी करण्यात आले होते. एनआयएचा दावा आहे की, दहशतवादी बलजीत हा भारतातील गँगस्टर अर्शदीप डल्लाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून काम करत होता. त्याने भारतातील अर्श डल्लाच्या इतर सहयोगींना लॉजिस्टिक सहाय्य देखील दिले आहे.

बलजीत सिंग हा ज्यांच्याकडून वसुली केली जाऊ शकेल, अशा लोकांवर नजर ठेवून त्याची माहिती केटीएफला (खलिस्तानी टाईगर फोर्स) देत असे. तसेच तो भारतात केडरची भरती आणि दहशतवाद्यांना निधी पुरवण्याचेही काम करत असे.
हे ही वाचा : 
पुण्यातून नाकाबंदीदरम्यान सापडले १३८ कोटींचे सोनं
जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द
‘सहाव्यांदा उमेदवारी, नागपूरच्या जनतेचा आशीर्वाद’
देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय
Exit mobile version