26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषखडकवासला धरण १००% भरले

खडकवासला धरण १००% भरले

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकसावला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय.

पुणे जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मुळशी धरणात सध्या ९४% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी २०००-२३०० क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.

हे ही वाचा:

रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, पुढील ३ ते ४ दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यात सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा