केजीएफ-२ चित्रपटाने गाठला एक हजार कोटींचा टप्पा

केजीएफ-२ चित्रपटाने गाठला एक हजार कोटींचा टप्पा

केजीएफ-२ चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज जबरदस्त व्यवसाय करत आहे. सोशलमीडियावरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

केजीएफ-२ चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक यशस्वी झाला असून या चित्रपटाने संपूर्ण भारतात जबरदस्त व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने एक हजारकोटींचा टप्पा ओलांडला आहे. केजीएफ-२ हा बाहुबली-२, दंगल आणि RRR नंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
शनिवार, ३० एप्रिल रोजी चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर करताना, रमेश बाला यांनी ट्विटरवर लिहिले, केजीएफ-२ ने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दंगल, बाहुबली-२ आणि RRR नंतरचा हा चौथा भारतीय चित्रपट आहे ज्याने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

हे ही वाचा:

खलिस्तान मुर्दाबाद! बाळासाहेब ठाकरे असते तर…

हंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन

Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

आता चित्रपटाच्या १६ व्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. शुक्रवारी या चित्रपटाने ४.२५ कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटाने केवळ हिंदीमध्ये ३५३.०६ कोटींची कमाई केली आहे. कमाईबद्दल माहिती देताना चित्रपट समीक्षक आणि व्यवसाय तज्ञ तरण आदर्श म्हणाले की, चित्रपट लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. तर, रिलीजपूर्वीच आगाऊ तिकीट बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने सर्व विक्रम मोडीत काढले होते.

Exit mobile version