यंदाचा १४ वा केशवसृष्टी पुरस्कार संभाजी नगर येथील स्नेहसावली केअर सेटर चे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर ह्यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी उत्तन, भाईंदर, जि. ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये हा पुरस्कार इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजी नगर येथील डॉक्टर हेडगेवार इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर अनंत पंढरे ह्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. एक लाख रू., मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉक्टर बालाजी आसेगावकर यांनी स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना आजारी आणि परावलंबी वयोवृद्धंची आबाळ बघून त्यांची विशेष काळजी घेणारे केंद्र सुरू करण्याचे ठरवले. त्यांच्या अनेक डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने त्यांनी २०१८ मध्ये स्नेहसावली ही संस्था स्थापन केली . त्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेतले. आणि संस्था नव्हे तर एक घरच उभे केले.
स्नेहसावली मध्ये आज सर्व वयाचे पीडित, ज्येष्ठ नागरिक, निराधार, परावलंबी, एकटे पडलेले दिव्यांग, निराश, हतबल मनोरुग्ण अश्या सर्वांना मायेने शारीरिक आणि मानसिक उपचार दिले जातात. डॉक्टर आसेगावकर ह्यांना काही वर्षापूर्वी एक गोष्ट निदर्शनास आली की, अनेक कुटुंबात वडीलधाऱ्या मंडळींना दीर्घकाळ उपचार देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या नोकरी – व्यवसायामुळे कुटुंबीयांना घरात थांबून त्यांची सेवा करणे अशक्य होत. अश्या रुग्णांवर स्नेहसावली मध्ये उपचार केले जातात.
हे ही वाचा:
ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजसाठी ‘राम सिया राम’
अझरबैजानचे पाकप्रेम उफाळले; भारत-आर्मेनिया शस्त्र करारावर टीका
काँग्रेस नेते सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा बँकेचा घोटाळा
येथे मुख्यत: पॅरालिसिस, पेराप्लेजिया ,पार्किंसन्स, कोमा, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, मतीमंदता, अल्झायमर ह्या व्याधींनी किंवा इतर कुठल्याही कारणाने शरीरिकरीत्या अक्षम व्यक्तींवर उपचार केले जातात. संस्थेमध्ये रुग्णांची २४ तास संपूर्ण वैयक्तिक स्वच्छता , रोज डोक्टरांची, तपासणी, नर्सिंग केअर, पथ्यानुसार आहार, व्यायाम वगैरेचा समावेश आहे, तसेच ऑक्सिजन सिलेंडर, नेब्युलायझर, सक्शन मशीन हयसारखे तातडीच्या वेळी लागणारी उपकरणेही आहेत. तसेच एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध आहे.
स्नेहसावलीचे सर्व पदाधिकारी हे संभाजी नगर मधील प्रथितयश डॉक्टर्स असून सामाजिक कार्याच्या तळमळीमुळे त्यांनी स्नेह सावली हा प्रकल्प सुरू केला. येथे जवळपास ४० टक्के रुग्ण हे मोफत किंवा सवलतीच्या दरात दाखल करून घेतले जातात.