दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजसाठी ‘राम सिया राम’

के. एल. राहुल आणि केशव महाराज यांचा झालेला संवाद व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजसाठी ‘राम सिया राम’

भारताने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन एकदिवस मालिका २-१ ने खिशात घातली. या समान्यात एक मजेशीर व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे. भारतीय कर्णधार के. एल. राहुल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांचा झालेला संवाद. तिसऱ्या एकदिवस सामन्यात केशव महाराज मैदानात फलंदाजीसाठी आला. तेव्हा मैदानात राम सिया राम हे गाणं वाजवण्यात आले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज मैदानात जेव्हा गोलंदाजी किंवा फलंदाजी करत असताना राम सिया राम हे गाणे वाजवले जाते. कालच्या सामन्यातही महाराज फलंदाजीसाठी आला असताना हे गाणे वाजवले गेले. त्यावेळेस यष्टीच्या मागे उभा असलेल्या राहुलचे आणि केशव महाराज यांच्यात एक मजेशीर संवाद झाला.

हेही वाचा :

“शरणागती पत्करा अथवा मरणाला सामोरे जा”, नेतन्याहूंचा हमासला इशारा!

श्रीराममंदिरासाठी २१०० किलोची घंटा!

अझरबैजानचे पाकप्रेम उफाळले; भारत-आर्मेनिया शस्त्र करारावर टीका

सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षात निकाली काढले ५२ हजार खटले!

या संवादाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये के. एल. राहुल केशव महाराजला म्हणाला, केशवभाई तुम्ही जेव्हाही मैदानात येता, तेव्हा डीजे राम सिया राम हे गाणे वाजवतो. या संवादावर आफ्रिकेचा केशव महाराज हे ऐकून हसू लागतो. या दोन्ही क्रिकेटपटंच्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

केशव महाराज याआधी भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसला आहे. तो बजरंग बली म्हणजेच हनुमानाचा भक्त आहे. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर केशव महाराजने सोशल मीडियावर एक संदेश लिहिला होता. मी देवावर विश्वास ठेवतो. माझ्या संघाने किती चमकदार क्रिकेट खेळले आणि एक विशेष निकाल. जय श्री हनुमान.

Exit mobile version