अभिनेता अक्षय कुमार यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केसरी चैप्टर २’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची अंगावर शहारे आणणारी झलक पाहायला मिळते.
या चित्रपटात अक्षय कुमार एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत म्हटले आहे, “त्यांनी आपली मान नेहमी उंचावत ठेवली. त्यांना त्यांच्या खेळात पराभूत केले. त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. एक नरसंहार, ज्याबद्दल भारताला नक्कीच माहिती असायला हवे. ‘केसरी चैप्टर २’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. जलियांवाला बागची अनकही कहाणी १८ एप्रिलला चित्रपटगृहात पाहा.”
टीझरच्या सुरुवातीच्या ३० सेकंदांमध्ये फक्त किंकाळ्या, वेदना, करुण क्रंदन आणि गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. कोणताही दृश्यांश नसताना फक्त आवाजाद्वारे जलियांवाला बाग हत्याकांडातील भीषणता दर्शवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सर सी. शंकरन नायर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. जे एक निडर वकील होते आणि ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याशी संघर्ष करण्याचे धाडस दाखवले होते.
निर्मात्यांनी अलीकडेच ‘केसरी चैप्टर २’च्या प्रदर्शन तारखेची घोषणा केली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रेक्षकांना माहिती देण्यात आली. अक्षयने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून सांगितले की, ‘केसरी चैप्टर २’ १८ एप्रिलला जागतिक स्तरावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
अक्षय कुमारने नुकतेच २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ या चित्रपटाच्या सहा वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा केला. त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘केसरी’च्या काही चित्रफिती शेअर करत लिहिले, “६ वर्षांपूर्वी… शौर्याच्या एका कहाणीने देशाला हादरवून सोडले होते.” अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्राही मुख्य भूमिकेत होती.
हेही वाचा :
मुंबईत १३ महिन्यांत ६५ लाख वाहन चालकांनी नियम मोडले
जिथे जिथे हिंदूंची संख्या कमी झाली तिथे त्यांना मारहाण झाली, हिंदूंनी संख्या वाढवावी!
“गव्हाच्या शेतात आढळणारे ‘पित्तपापडा’ गवत – एक आयुर्वेदिक वरदान”
‘केसरी’मध्ये सारागढी किल्ल्याची कहाणी दर्शवण्यात आली होती. जिथे १८९७ मध्ये ब्रिटिश भारतीय सेनेच्या ३६व्या सिख रेजिमेंटच्या फक्त २१ सैनिकांनी तब्बल १०,००० अफगाण सैनिकांना पराभूत केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार शूरवीर हवालदार ईशर सिंग यांच्या भूमिकेत झळकले होते.
करण सिंग त्यागी दिग्दर्शित ‘केसरी चैप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन्स, केप ऑफ गुड फिल्म्स आणि लिओ मीडिया यांनी केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत आर. माधवन आणि अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.