26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष'केरळ स्टोरी'तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट

‘केरळ स्टोरी’तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट

सेन्सॉर बोर्डाने घेतला निर्णय, ५ मे रोजी होणार चित्रपट प्रदर्शित

Google News Follow

Related

सध्या केरळ स्टोरीची चर्चा देशभरात आहे. या चित्रपटात केरळमधील मुस्लिमेतर महिलांना कसे इस्लामी दहशतवादाकडे वळविण्यात आले याचे चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

केरळ स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात येत असून त्याआधी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला अ प्रमाणपत्र दिले असून त्यातील १० प्रसंग कापण्यात आले आहेत.

दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. केरळ सरकारने तर या चित्रपटावर बंदी आणली पाहिजे, हा चित्रपट चुकीचा प्रचार करतो असे आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५ मे रोजी जेव्हा चित्रपट सिनेमागृहात येईल तेव्हा काय होईल, याची उत्सुकता आहे. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले आहे. तसेच त्यातील १० आक्षेपार्ह प्रसंग काढण्यात आल्याचे कळते. त्यात एका प्रसंगात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा प्रसंगही समाविष्ट आहे. ते मुख्यमंत्री व्हीएस. अच्युतानंद असल्याचे म्हटले जात आहे.

हिंदू देवीदेवतांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरल्याचा एक प्रसंग आहे तोदेखील चित्रपटातून वगळण्यात आला आहे. काही संवाद हे बदलण्यात आले आहेत. एका संवादात भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत, या वाक्यातून भारतीय हा शब्द काढण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये

काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन

गँगस्टर- राजकारणी मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारीची खासदारकी रद्द!

या चित्रपटात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत दाखविण्यात आली आहे. त्यात पुढील दोन दशकात केरळ हे मुस्लिमबहुल राज्य बनेल आणि राज्यातील युवक हे इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इच्छुक आहेत, असा उल्लेख आहे. ती संपूर्ण मुलाखत रद्द करण्यात आली आहे.

नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यात शालिनी उन्नीकृष्णन तथा फातिमा बा हे पात्र रंगविण्यात आले आहे. अदा शर्माने ही भूमिका निभावली आहे. शिवाय, केरळमधील ३२ हजार महिलांना कशापद्धतीने इस्लामिक स्टेट  दहशतवादी संघटनेत सामील करण्यात आले याचे चित्रण करण्यात आले आहे. त्यात ही शालिनी एक महिला असते हे त्याचे कथानक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा